Saturday 8 September 2012

मनातले लेखणीतून ....

                              मागण्यांच्या गर्दीत हरवून चालल्या मागण्या!
           

मित्रहो,गेल्यावर्षी अक्टोबर मध्ये माग्मोने `अभूतपूर्व` असे आंदोलन केले.ह्या आंदोलनाचे खास वैशिष्ट्ये
म्हणजे संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या व्यापक स्तरावर सर्व घटकांना सम्मिलित करून घेण्यात आले होते.वर्तमान माग्मो टीम ही वैचारिक आणि मोठ्या मनाची आहे त्यामुळे त्यांनी `शासकीय सेवेतील अन्यायग्रस्त डॉक्टर ` हा आपल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू घटक मानला कारण ही लहान समूह शासनाकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी व्यापक लक्ष्यवेधी आदोलन केवळ त्यांच्या लहान समूहाद्वारे एवढे परिणामकारक करू शकले नसते म्हणून माग्मोनी आपले व्यासपीठ सर्वाना आप आपल्या मागण्या रेटण्यासाठी मोठ्यामानाने वा परिपक्वतेची चुणूक दाखवत उपलब्ध्द करून दिले होते . सबब आंदोलनात जिल्हा आरोग्याधिकारी संवर्ग,जिल्हा शल्याचीकीत्सक, वै. अधीक्षक संवर्ग, विशेष तज्ञ संवर्ग,डेंटल ,अस्थायी बी. ए. एम. एस. गट- ब /आयुर्वेद माग्मो इ .चीं न भूतो न भविष्याती मोट बांधून व्यापकता आणली होती एवढेच नव्हे तर आरोग्याभवानातील वरीष्टांच्या निगडीत मागण्याही माग्मोने हिरीरीने घेतल्या होत्या.हे घटक माग्मोचे सदस्य ही नसताना माग्मोच्या वर्तमान टीम ने ह्या सर्व घटकांना एकत्रित आणून लढाईची रणदुदुम्बी मोठ्या परिणामकारकरित्या शासना दरबारी वाजवून मुत्सादिगीरीने पहिला पडाव जिंकला होता!
आंदोलनात पूर्वी झालेल्या आंदोलना पेक्षा अभूतपूर्व असा प्रति साद लाभला , तरीही काहीं घटक बघ्याची भूमिका घेत दुरून निष्क्रिय राहिले. जे होते तेही जास्त ताणण्याच्या मनस्थितीत नव्हते, मुळात आम्हा लोकांना आंदोलनाचा अनुभवच नाहीं,दबकत, बुजत लाजत आणि धाक धुकीने,किंव्हा कायम काहीं प्रतिकूल कार्यवाहीच्या अज्ञात भीतीने किंवा मला काय त्याचे ह्या बेफिकीरीने lightly मूड ने आपण आंदोलने केलीत त्यामुळेच आंदोलनाच्या नेतृत्वाचा खरा कस लागतो. शासनाकडेही असल्या सैन्यासह लढा देताना मोठ्या आवाक्याची भयंकर लढायीचा आव आणतांना सेनापतीची स्थिती खरच विचित्र असते.काहीं लोक माझ्या ह्या मताशी सहमत नसतील ही परंतु तुम्हीच कल्पना करा इतर कर्मचारी कामगार इ. चे कडकडीत बंद , मोर्चे , अटकसत्र , इ. आणि वै. अ. चे सिविल ग्रा. रु. बंद आणि मोर्चे..सहभाग संख्या! असो आंदोलनाचे विश्लेषण करणे इथे माझा खरा उद्देश नाही.
इतक्या घटकांना सामील केल्याने साहजिकच मागण्याची यादीही लांबली , आणि प्रत्येक घटकाला ती ती मागणी प्रिय महत्वाची जीवन मरणाची , उदा. २००९ साली सेवासामावेषण झाल्याले १५-२० वर्षे सेवा झाल्याल्या वै . अ चि सेवा एकदम शून्यावर आणणारी कसलेही सेवालाभ नाकारणारी नैसर्गिक न्याय नाकारणारी अटी शर्ती लादून त्यांच्या आयुष्याचा पुरता खेळखंडोबा करण्यात आलाय आणि आयुष्याचे ऐन
उमेदीचे १५-२० वर्षे इथे घातल्याने परतीचे दोर ही कापलेले! असा पुरता कोंडला गेलेल्या सेवासामावेशानाच्या वै. अ. चि पुर्वलक्षि लाभाची मागणी , अतिशय महत्वाची,तशीच गोष्ट अस्थायींची,तीच परिस्थिती, वरिष्ठ  वै अ चि म्हातारपणी ही खेड्यापाड्यातच वै . अ म्हणून झिजून जाण्या पासून वाचवणारी पदोन्नतीची,NPA , वेतन आयोग इ. इ. इ. जरी ह्या मागण्या त्या त्या संवर्गाच्या प्रतिनिधींनी  शासनाकडे मांडायच्या वा माग्मो अध्यक्षांनी त्यांना साथ द्यायची  असे असले तरी माग्मो अध्यक्षच ह्या सर्व मागण्या शासन दरबारी मांडतायेत असे चित्र दिसते व यादी लांब त्यामुळे कोणती ही मागणी धसास लागताना दिसत नाहीं.                        प्रत्येक मागणीचे `लोकपाल` बिल होऊन बसलाय असे चित्र समोर येत आहे! शासनाला काहीं देणे  घेणे नाहीं, न घाई नाहीं, न कोणती मागणी तत्परतेने निकाली काढायची कसलीही वेगवान हालचाली नाहीत , अध्यक्ष आणि टीम धड्पाद्कारणे भेटणे आणि मागणी निकाली काढणे साठी आग्रह  धरणे ह्यापेक्षा ज्यास्त काय करणार,एक वर्ष झाला शासनाने लिखित आश्वासन देऊन ही त्यांची गती ही प्रगती म्हणण्या  इतपत न वाटता वेळकाढू वाटतेय ,आणि मुळात वै. अ न त्यांना काहीं द्याचं असे अजिबात वाटत नाही.केवळ आंदोलनाचा रट्टा होता म्हणून नाविलाजाने काहीं बाबी बळेच कराव्या लागतायेत असे दिसते.वास्तविक पाहता शासकीय सेवेत डॉक्टर आकर्षित करण्यासाठी व आहेत ते डॉक्टर टिकवण्यासाठी इतर राज्य डॉक्टरांच्या प्रश्न कडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन त्यांची आरोग्य व्यवस्था सुधारत आहेत पण महाराष्ट्रात  बाबू लोकांना `आम्हाला काय त्याचे` भले रिक्त राहो/ पडे व बुडो खाते आम्ही ह्या डॉक्टरना छळण्याचा वसा घेतलाय ! आरोग्यमंत्री सचिव ह्यांना जबादारीची जाणीव आहे त्यांना लोकांना उत्तरे द्यावी लागतात त्यामुळे ते वै अ चे प्रश्न सोडवून खाते सुधारण्यचे दृष्टीने धडपडताना दिसतात पण मंत्रालयातील काहीं झारीतले शुक्राचार्य ज्यांना काहीही देणे घेणे नाही ते वै. अ.छळण्याचे काम कौशल्याने वा नेटाने करतायेत. ही बाब तुम्ही  शासनाचे वै. अ. संबंधी  निघणाऱ्या जी. आर. कडे,पत्रांकडे,परीपत्रकांकडे  त्याच्या भाषेकडे नुसती नजर टाकली तरी लक्षात येईल! मग ते जी आर असोत किंवा pool  sms पत्रक असो , वा गावभेट कार्यक्रम पत्रक असो वा आणखी काही .त्यात वै. अ. ह्यांच्या अडचणीचे सोडा साधी व्यवहार्यता सुध्दा पहिली जात नाही , केवळ छळ हाच उद्येश दिसतो.    गेल्यावर्षभरात महत्वाचे केवळ २ दोन जी आर बाहेर पडलेत . एक  पी . जी. वै. अ साठी  ३ वा ६ वेतनवाढींचा, दुसरा आताचा NPA चा , काय भाषा आहे त्या जी आर ची देणे कमी अन अटी जास्त! अटी ही अश्या कि त्या वै अ ला वाटावे ``का मागीतालेबुवा आपण हे उगीच`` असा वाटावे . इतके अपमानित करणारे गुलाम सारखे.     दोन जी आर! पण एकाची ही आतापर्यंत अंमलबजावणी करता येऊ शकत नाहीं अशा त्रुटी ठेऊन नंतर प्रत्येक जी आर ला  दुरुस्ती करावी लागावी त्यासाठी परत  लढा ! काय चाललाय हे? हेतुपुरस्सर मंत्रालयातील कोणी बाबू/कारकून ग्रुप हा कायम वै . अ .च्या विरोधातला आहे हे नक्की;कारण ह्यापूर्वीही NPA चे जी आर निघालेत त्याची भाषा अशी नव्हती.इतर खात्यातील  जी आर कसे सरळ सरळ आणि सुस्पष्ट असतात . नेमके आपलेच जी आर आसे संदिग्ध , अन्याय कारक आणि जणू नाविलाजाने देतोय तेही गुलामासारखे आणि तेही सहज घेता येऊ नये ह्याची सोय करणारी drafting करणारे अधिकारी कर्मचारी हेच  वै.अ. चे खरे शत्रू आहेत.             आरोग्यमंत्री वा सचिव ह्यांना अशी अडवा अडवी अन्याय नक्कीच अभिप्रेत नसावी.परंतु ही बाबू मंडळी वै. अ.च्या   पर्यायाने आरोग्य खात्याच्याच मूळावर उठली आहे. अश्याने डॉक्टर  मंडळी शासकीय सेवेत कसे आकर्षित होणार आणि आहे ते डॉक्टर कसे टिकणार?  नेहमीच ही nonmedical nontechnical कारकून/अधिकारी मंडळी शालेय-महाविद्यालय जीवनापासून आपण डॉक्टर न झाल्याचे शल्य आणि सोबतचे मित्र डॉक्टर झाल्याने  तथाकथित रित्या हे त्याच्यासमोर कमी बुद्धीचे ठरल्याने  ह्यांचा अहं दुखावल्याची भळभळती  जखम आयुष्यभर अश्वथाम्याप्रमाणे ऊरात बाळगून असतात त्यामुळे आपसूकच शासकीय वैद्यकीय अधिकारीच्या रूपाने एक  डॉक्टर त्यांच्या बालपणापासून जपलेल्या शल्यासाठी वा असुयेसाठी तावडीत सापडतो. मग ते छळ करून असुरी आनंद घेतात.वास्तविक पाहता  बुद्धीचे वा प्रतिभेचे मूल्यमापन केवळ डॉक्टर इंजिनिअर होण्याने केले जाऊ शकत नाही.असो.           अश्या पार्श्वभूमीवर अश्या लोकांकडे माग्मोच्या अनेक मागण्या पडून आहेत! एकूण १५-२० प्रमुख मागण्या आहेत , मागण्याची इतकी गर्दी कि या गर्दीतच मागणीचे महत्व हरवून जावे!जेंव्हा आरोग्यमंत्री वा सचिवासमोर सादरीकरण करतो तेंव्हा त्यांनी इतकी यादी ऐकून नुसते बर next , बर  next.....म्हणावे .! गांभीर्यच नाहीसे होऊन जातेय ...सर्व मागण्या एकाचवेळी त्यामुळे कोणत्या मागणीचे काय चाललय  आणि काय होतेय ह्याचा  ताळमेळ लावताना दमछाक होतेय म्हणून तर असे  असे त्रुटीयुक्त अन्यायकारक जी. आर निघत नसावेत ..करत बसा नंतर दुरुस्त्या ....  त्यामुळे २००९च्य समावेशित वै. अ चि मागणी मागे पडतेय किंवा मागील जी आर चा इतिहास बघून त्यासंबधीचा जी आर ही असच डोकेदुखीदेणारा  पदरी घोर निराशा करणाराच निघेल अशी भीती वाटते.त्यामुळे पुर्वलक्षिलाभ इच्छुक वै अ , ह्यांचा धीर सुटत चालला आहे .त्याला दुसरे अदृश्य कारण हे कि काहीं घटक हे दुटप्पी-तिटप्पी  मार्गाचा अवलंब करून वातावरण दुषित करून सगळा खेळ खंडोबा होण्याची भीती आहे.काहीं लोक इकडे माग्मो अध्यक्षांचाही वापर करतायेत व मागच्यादाराने वाटाघाटी दुसरे दबावतंत्र ,लक्ष्मि दर्शन इ. मार्गासाठी धडपडताना दिसताहेत.बाकिंच्याच्या मागण्याचे काहींही होवो आम्हाला काय त्याचे आपले करून घेऊ काहीं करून भले वाममार्गाने का होईना मग सगळा खेळखंडोबा झालातरी चालेल ... ही वृत्ती वाढतेय.अध्यक्षांची सगळी शक्ती ह्याच्यासाठी आणि हे परत`` मागचे दारात`` अध्याक्ष्याला वाकुल्या दाखवत!त्यामुळे इतर मागण्या गर्दीत हरवून चालल्या आहेत.मागे पडताहेत .माग्मो अध्यक्षांनी ही वेळीच सावध होवून आपली उर्जा योग्यत्या कारणासाठी उपयोगात आणली पाहिजे .ह्यामुळे वेळीच सावध होवूईन योग्य तो मार्ग अनुसरावा लागेल.अन्यथा वेळ निघून जाईल , बाबा हि गेल्या आणि दशम्याही हि अशी गत होवू नये .